Home क्राईम भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

0
136

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रस्त्याच्या खराब अवस्थेकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याची घटना १४ एप्रिल रोजी दुपारी रिधूर गावाजवळ घडली. या अपघातात संजय रुपचंद कोळी (वय ५१, रा. विदगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संजय कोळी हे विदगाव येथील दत्त मंदिराजवळ राहतात. नेहमीप्रमाणे ते आपल्या (एमएच १९ बीके ७५७८) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना, विदगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १८ बीआर ३७२९) क्रमांकाच्या कारने रिधूर गावाजवळ त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की संजय कोळी यांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

धडक दिल्यानंतर कारचालक अपघातस्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर संजय कोळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोहेकॉ श्रीकांत बदर हे करीत आहेत.


Protected Content

Play sound