Home Cities अमळनेर भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; पत्नी ठार, पती जखमी

भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; पत्नी ठार, पती जखमी

0
254

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे एका भरधाव बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने लता मुरलीधर पाटील या महिलेला जीव गमवावा लागला असून त्यांचे पती मुरलीधर पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील हे दहिवद शिवारातील शेतात जाण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना घडली. दरम्यान, चोपडा येथून अमळनेरकडे येणाऱ्या यावल आगाराच्या (एमएच २० बीएल २६५६) क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीसह दोघांनाही बसने जवळपास ५० ते ६० फूट ओढत नेले.

या धडकेत लता पाटील गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती मुरलीधर पाटील हे देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमळनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Protected Content

Play sound