Home Cities अमळनेर लोखंडी रॉडने हातापायावर वार; तरूण गंभीररित्या जखमी

लोखंडी रॉडने हातापायावर वार; तरूण गंभीररित्या जखमी

0
154


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणाऱ्या चार जणांनी एका तरूणाला पकडून लोखंडी रॉडने हाता पायाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खुर्द गावात विजय योगराज कोळी वय २४ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी १३ एप्रिल रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे वासुदेव नामदेव कोळी, राजेंद्र सुरेश कोळी, किरण आधार कोळी, महेंद्र भावलाल ठाकरे यांनी लोखंडी रॉडने विजय कोळी याच्या हातापायावर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा भाऊ गोपाल कोळी याने भांडण सोडवून तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याबाबत विजय कोळी यांनी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी वासुदेव नामदेव कोळी, राजेंद्र सुरेश कोळी, किरण आधार कोळी, महेंद्र भावलाल ठाकरे सर्व राहणार हिंगोणे खुर्द ता.अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound