
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत कृषी विकास प्रकल्पाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी मंगळवार १५ एप्रिल रोजी संपूर्ण गावातून मशाल फेरी काढण्यात आली. याव्यतिरिक्त, १५ ते २५ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयापासून निघालेल्या या मशाल फेरीत सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, डॉ. राजेंद्रकुमार झांबरे, कृषी सहाय्यक आर. बी. पवार आणि सविता पवार, रोजगार सेवक डिगंबर खडसे, शरद राणे, दिनकर पाटील, सुरेश झांबरे, कीर्ती महाजन, हर्षदा कोलते, जोत्स्ना भिरूड, अरुणा चौधरी, ज्योती कोलते, हलीमा तडवी, विलास चौधरी, सुपडू तडवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत १६ एप्रिल रोजी सकाळी प्रभातफेरी आणि सायंकाळी गावबैठक आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १५ ते २१ एप्रिल या काळात श्रमदान, शिवार फेरी, माती परीक्षण आणि विहीर तपासणी यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कृषी सहाय्यक आर. बी. पवार आणि सविता पवार यांनी गावकऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या या लोकसहभागीय कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


