Home Cities यावल जळगाव ते किनगाव रस्त्यासाठी निधी मंजूर; आ. चंद्रकांत सोनवणेंच्या प्रयत्नांना यश

जळगाव ते किनगाव रस्त्यासाठी निधी मंजूर; आ. चंद्रकांत सोनवणेंच्या प्रयत्नांना यश


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा विधानसभेचे आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून जळगाव ते किनगाव या २४ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ट्रिमिक्स काँक्रिट कामासह मोठ्या स्वरूपातील रस्ता विकास प्रकल्पास १०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवार दिनांक १२ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन कार्यक्रमाचा भव्य सोहळा किनगाव (ता. यावल) येथे पार पडला. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे, माजी आमदार सौ. लताताई सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, संचालक सूर्यभान पाटील, किनगाव बु. सरपंच सौ. स्नेहल चौधरी, किनगाव खु. सरपंच सौ. रूपाली कोळी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका कांचन फालक व संचालक उज्जैनसिंग राजपूत, माजी जि.प. सदस्य सुभाष सोळुंके, कोळन्हावीचे सरपंच विकास सोळुंके, चिंचोलीचे माजी उपसरपंच निलेश सोळुंके, पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दीपक पाटील, तसेच विलास पाटील, गोकुळ पाटील, देविदास पाटील, पंजाबराव पाटील, निळकंठ पाटील, माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमास चोपडा ग्रामीण भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शिवसेनेचे भरत चौधरी, मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, शिरसाडचे माजी सरपंच प्रवीण सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, अजय पाटील, अनिल पाटील तसेच श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे सर्व पदाधिकारी, शिवसेना पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्याच्या विकासामुळे जळगाव ते किनगाव या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound