Home Cities अमळनेर मोटरसायकल चोरी प्रकरणी आरोपी अटकेत

मोटरसायकल चोरी प्रकरणी आरोपी अटकेत


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । झाडी येथील रहिवासी महेंद्र धनसिंग पाटील यांच्या मोटारसायकल चोरी प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शहरातील झाडी येथील रहिवासी महेंद्र धनसिंग पाटील यांची हिरो कंपनीची फॅशन I3s मोटरसायकल (MH 19 EE 7165), दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते ९.२० दरम्यान पुनम हॉटेल शेजारी पार्क केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत फिर्यादीनुसार अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२४ भादंवि कलम ३०३(२) अंतर्गत दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे झाडी येथील हिरालाल छोटू पाटील यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

परी. पोलीस उप अधीक्षक केदार बारबोले, यांचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशान्वये अमळनेर पोलीस स्टेशनचे पो.उ.पनि. राजू जाधव व गुन्हे शोध पथकातील पोलीस पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, गणेश पाटील, राजेंद्र देशमाने, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव,अमोल पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, उदय बोरसे यांच्या पथकानेही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे व कॉन्स्टेबल भूषण परदेशी करत आहेत.

दरम्यान, अमळनेर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती पोलिसांना तत्काळ कळवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले असून, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound