Home क्राईम नातेवाईकांकडे लग्नात आलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

नातेवाईकांकडे लग्नात आलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
131


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे लग्नाच्या निमित्ताने आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता समोर आले आहे. या संदर्भात बुधवारी ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान जळगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे लग्नासाठी ती मंगळवारी ८ एप्रिल रोजी आलेली होती. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पीडित मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्या शोध घेतला. परंतु तिच्या संदर्भात कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्त विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ हे करीत आहे.


Protected Content

Play sound