Home राजकीय रावेरात खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा भाजपाकडून तीव्र निषेध

रावेरात खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा भाजपाकडून तीव्र निषेध


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना, आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरल्याच्या निषेधार्थ रावेर भाजपाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.

भाजपाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “खडसे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खालच्या स्तराचे असून, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी त्वरित जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, “खडसे यांची भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असून, अशा वक्तव्यांमुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. सार्वजनिक जीवनात अश्लील भाषा आणि खालच्या पातळीवरील टीका यांना थारा देण्यात येणार नाही,” असे ठाम मत भाजपाने व्यक्त केले.

या आंदोलनात भाजपाचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रदेश सदस्य सुनील पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील, चंदु पाटील (के-हाळा), महेंद्र पाटील, चेतन पाटील, दुर्गादास पाटील, अजिंक्य वाणी, बाळा आमोदकर आदींचा समावेश होता. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound