Home राजकीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

0
36
balasaheb thorat

balasaheb thorat

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत पक्षातर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यानुसार या पदाची धुरा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात अली आहे. त्यांच्यासोबत पाच नवे कार्याध्यक्षही नेमण्यात आले आहेत. यात नितीन राऊत, विश्‍वजित कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांचा समावेश आहे. दरम्यान, या नेमणुकांसोबत पक्षाने विविध समित्यांची घोषणाही या वेळी केली. त्या समित्या व अध्यक्ष असे : रणनीती समिती – बाळासाहेब थोरात जाहीरनामा – पृथ्वीराज चव्हाण; निवडणूक – बाळासाहेब थोरात; समन्वय – सुशीलकुमार शिंदे; प्रचार – नाना पटोले प्रसिद्धी – रत्नाकर महाजन; माध्यम आणि संपर्क – राजेंद्र दर्डा तर निवडणूक व्यवस्थापन समिती – शरद रणपिसे यांचा या समित्यांमध्ये समावेश आहे.


Protected Content

Play sound