Home Cities यावल उंटावद व डोणगाव सहकारी सोसायट्यांची १००% कर्ज वसुली

उंटावद व डोणगाव सहकारी सोसायट्यांची १००% कर्ज वसुली


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. उंटावद आणि डोणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. डोणगाव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ३१ मार्च २०२५ पूर्वी १०० टक्के बँक कर्ज वसुली पूर्ण केली आहे. या यशस्वी कर्ज वसुलीबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दोन्ही संस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक हिरामण नागो महाजन, क्षेत्रीय अधिकारी अरुण टी. तायडे, तसेच उंटावद सोसायटीचे चेअरमन शशिकांत (शशी आबा) गुलाबराव पाटील, संचालक मंडळ, सचिव संजय दिनकर महाजन, किनगाव शाखा व्यवस्थापक विनोदकुमार निळकंठराव देशमुख व सर्व कर्मचारी यांना विशेष गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे, डोणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन साहेबराव भाऊराव पाटील, संचालक मंडळ व सचिव संजय दिनकर महाजन यांचेदेखील अभिनंदन करण्यात आले.

या यशस्वी कर्ज वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व संगितम ट्रॅव्हल्सचे संचालक विनोदकुमार पंडितराव पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, कर्ज वसुली व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे, व्यवस्थापक आर.आर. पाटील यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याची प्रशंसा केली. शेतकरी हित व सहकाराच्या बळकटीसाठी या दोन्ही सहकारी संस्थांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.


Protected Content

Play sound