Home क्राईम खंडेराव परिसरातून रिक्षाची बॅटरी चोरीला

खंडेराव परिसरातून रिक्षाची बॅटरी चोरीला

0
21
1Mahavitaran 111111111
1Mahavitaran 111111111

 

1Mahavitaran 111111111

जळगाव प्रतिनिधी । खंडेराव नगर परिसरात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या रिक्षातून बॅटरी चोरीला गेल्याचा प्रकार आज (शनिवारी) रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शेख सिद्दीक शेख राउफ वय 28 रा खंडेराव नगर हे रिक्षाचालक असून त्यांची रिक्षा क्रमांक एमएच 19 व्ही 8626 ही 12 जुलै रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास खंडेराव नगरातील व्यायाम शाळा जवळ लावली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री 12 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान रिक्षाची 4 हजार 500 रुपये किमतीची बॅटरी चोरीस नेली. यापूर्वी याच रिक्षाचे 15 दिवसांपूर्वी टायर देखील चोरीला गेले होते. बॅटरी चोरीप्रकरणी शेख सिद्दिक यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound