Home क्राईम पिंप्राळा रथोत्सवातून तिघांच्या मोबाईलची चोरी

पिंप्राळा रथोत्सवातून तिघांच्या मोबाईलची चोरी

how to safeguard your phone against theft
how to safeguard your phone against theft

how to safeguard your phone against theft

जळगाव, प्रतिनिधी | आषाढीनिमित्त पिंप्राळा येथे झालेल्या रथोत्सवात चोरट्यांनी मोबाईल चोरीत चांगलाच हात साफ केल्याचे आज स्पष्ट झाले आहे. यात तीन जणांचे मोबाईल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याबाबत रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत माहिती अशी की, काल आषाढी एकादशीनिमित्त शहरातील पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिरापासून रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रथोत्सवात तीन जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. यात अजित सदाशिव मेंडकी (वय ६६ ), रा.जैन पंपामागे निमखेडी रोड यांच्या शर्टाच्या वरच्या खिशातून १२ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल , रवींद्र कडू साठे (वय ४०) रा.पिंप्राळा, यांचा १० हजार रुपये किमतीचा एमआय कंपनीचा मोबाइल आणि देवेंद्र अशोक लोंढे (वय १८) रा. वाघ नगर, शाम नगर परिसर या तरुणाचा लेटमी नोट ७ कंपनीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरून नेला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound