Home Cities अमळनेर बोलीभाषा स्पर्धेत सागर कोळीला द्वितीय क्रमांक; संमेलनात मिळवले यश

बोलीभाषा स्पर्धेत सागर कोळीला द्वितीय क्रमांक; संमेलनात मिळवले यश


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (कबचौउमवि) तिसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर सुकदेव कोळी याने बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

संमेलनाच्या समारोप आणि बक्षीस वितरण सोहळ्याला कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि कार्याध्यक्ष अँड. अमोल पाटील, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे सल्लागार समिती सदस्य दिनेश नाईक, मानद संचालक प्रा. डॉ. एस. डी. ओस्तवाल, व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सागरच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ.पी.एस. पाटील, प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा.डॉ.डी.आर. ढगे, प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा.डॉ.श्वेता वैद्य, प्रा.डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. डॉ. भरत खंडागळे यांनी सागरचे अभिनंदन केले.

बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील साहित्यिक गुणांना प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. सागर कोळीच्या यशाने महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर उंचावले आहे.


Protected Content

Play sound