Home क्रीडा आकांक्षा म्हेत्रे करणार ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व

आकांक्षा म्हेत्रे करणार ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व

0
221

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सायकलिंग हा खेळ एक फॅशन म्हणून सुरू करणाऱ्या आकांक्षा म्हेत्रे या तरुणीने आता या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळवली आहे. रोजच्या कठोर परिश्रमामुळे आणि शिस्तबद्ध पध्दतीने सराव करून आकांक्षाने राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले आहे. ७ ते ८ जानेवारी दरम्यान दिल्ली येथे झालेल्या ३१व्या एशियन ट्रॅक सायकलिंग निवड चाचणीमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघामध्ये स्थान मिळवले.

२१ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान मलेशियाच्या निलाई येथे ३१व्या एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी आकांक्षा म्हेत्रे (बाहेती महाविद्यालय) दिल्लीहून १७ फेब्रुवारीला मलेशियासाठी रवाना झाली आहे. जळगावमधील पहिली सायकलपटू म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी आकांक्षा या क्षेत्रातील एक आदर्श बनली आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत एकूण १० देशांचे ८०० ते ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात भारताकडून आकांक्षा म्हेत्रे ही एकमेव सायकलिस्ट म्हणून स्पर्धेत भाग घेणार आहे. याआधीही तिने ट्रॅक, रोड आणि माउंटन बाईक या विविध शाखांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून आपल्या कौशल्याची छाप पाडली आहे. तिच्या या यशामागे तिच्या प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.


Protected Content

Play sound