Home Cities जळगाव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

0
110


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त जय शिवराय, जय भारत पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरात भव्य जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही पदयात्रा सकाळी ०८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून सुरु होईल. या पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल -कोर्ट चौक – पंडीत जवाहरलाल नेहरु स्मारक – डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक – टॉवर चौक – चित्रा टॉकिज – शिवतीर्थ असा राहणार आहे. तरी सर्वांनी जय शिवराय, जय भारत पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे रविंद्र नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound