Home क्राईम व्यापाऱ्याची ५ लाख ५६ हजारांची फसवणूक

व्यापाऱ्याची ५ लाख ५६ हजारांची फसवणूक


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील पोलन पेठमधून हार्डवेअर साहित्याची खरेदी करून मालाची पूर्ण रक्कम न देता मनोज विष्णू रडे यांची कर्नाटकातील लक्ष्मण शिवाप्पा असंगी या व्यापाऱ्याने ५ लाख ५६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज रडे यांचे पोलन पेठमध्ये प्रभात हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रीकल जनरल प्रा.लि. नावाचे दुकान आहे. जानेवारी २०२३मध्ये लक्ष्मण असंगी नामक व्यक्ती आला व त्याने कर्नाटकातील बागलकोट येथे रामदास सिस्टीम इरिगेशन नावाचे दुकान असल्याचे सांगत रडे यांना ६ लाख ९५ हजार २५१ रुपये किमतीच्या मालाची ऑर्डर दिली. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी रडे यांनी माल कर्नाटकात पाठविला. असंगीकडे पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने काही रक्कम दिली. नंतर ५ लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश पाठविला. मात्र तो एररमुळे वटला नाही. पैशांचा तगादा वाढल्यानंतर समोरील व्यापाऱ्याने मोबाईल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रडे यांनी बुधवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून लक्ष्मण शिवाप्पा असंगी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound