Home Cities अमळनेर संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या अत्याचारातून महिला गर्भवती !

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या अत्याचारातून महिला गर्भवती !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला आहे. या घटनेत महिलेच्या पहिल्या पतीशी घटस्फोट घडवून आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. त्यानंतर ती गर्भवती झाली, परंतु संशयित आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेचा तपशील असा आहे की, अमळनेर तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह राहत आहे. ती विवाहित असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. सन २०२१ मध्ये तिची ओळख एकनाथ छबीलाल पाटील (रा. सोनवद, ता. धरणगाव) याच्याशी झाली. ओळखीनंतर त्यांचे नाते प्रेमसंबंधात रूपांतरित झाले. आरोपी एकनाथने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मुलीचे संभाळण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलेने आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला आणि एकनाथसोबत पुण्यात पाच महिने पती-पत्नीसारखे राहू लागली.

या काळात महिलेवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले आणि ती गर्भवती झाली. परंतु, नंतर एकनाथने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला आणि मुलगी संभाळण्याची जबाबदारीही स्वीकारली नाही. यामुळे महिलेला आपल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने ११ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनुसार आरोपी एकनाथ छबीलाल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी डीवायएसपी आण्णासाहेब घोलप यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.


Protected Content

Play sound