Home Cities जळगाव जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेत शिक्षकांनी धरला सूर

जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेत शिक्षकांनी धरला सूर

0
103


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरुवर्य प. वी. पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३७ शिक्षकांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, परीक्षक शिरीष भाई गुजराती, देवेंद्र गुरव, शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि उद्योजक शरद पाटील (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत महेंद्र अरुण साळुंखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर राधिका सचिन करोडपती यांनी द्वितीय आणि गणेश भगवंत देशमुख यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रवीण गांधीले आणि जफर अकबर शेख यांनाही पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी केले. या स्पर्धेच्या निमित्ताने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना एक व्यासपीठ मिळाले, तसेच त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह वाढण्यास मदत झाली.


Protected Content

Play sound