Home क्राईम गांजाचा नशा करणाऱ्या दोघांवर एलसीबीची कारवाई

गांजाचा नशा करणाऱ्या दोघांवर एलसीबीची कारवाई

0
45


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून तलावाजवळील बगीचात अवैधपणे चिलममध्ये गांजा भरून नशा करणाऱ्या दोन जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे. यासंदर्भात रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या बगीच्या जवळ काही व्यक्ती चिलममध्ये गांजा भरून नशा करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मेहरून परिसरातील बगीचा जाऊन संशयित आरोपी मेहमूद शेख इस्माईल शेख वय-५८, रा.गेंदालाल मिल, जळगाव आणि रऊफ सत्तार बागवान वय-६०, रा.तांबापुरा या दोघांवर कारवाई करत त्यांच्याकडून गांजा आणि इतर साहित्य जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिलाल पाटील आणि विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound