Home धर्म-समाज वाणी समाज महिला मंडळातर्फे भारत माता पुजन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम

वाणी समाज महिला मंडळातर्फे भारत माता पुजन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील लाडशाखीय वाणी समाज संस्कृती महिला मंडळाच्या वतीने प्रजास्ताक दिना निमित्त भारत माता प्रतिमेचे पुजन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात अर्चना मैंद यांनी गणेश वंदना या गिताने केली यानंतर भारत माता प्रतिमेचे पुजन केल्यानंतर महिलांनी सामुहिक रामरक्षा स्त्रोत पठण करण्यात आले.

माधुरी अमृतकर यांनी स्वागत गीत सादर केले तर हेमलता चांदवडे व सुनंदा शेंडे यांनी कुलस्वामीनी जागर गित म्हटले व मंडळाच्या अध्यक्षा प्रा. वर्षा पुरकर यांनी मकर संक्रांती निमित्त हळदि कुंकवाचे महत्व, स्त्री व कुंटुबिक जबाबदारी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम हे महिलांचे आहे ते पटवून सांगितले. यावेळी पतंग मोहत्सवा बरोबरच विविध गेमचे आयोजन निता नावरकर, दिपिका शेंडे, वृषाली मालपुरे, विद्या येवले, योगिता येवले यांनी केले तर वंदना शेंडे, उषा शेंडे यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमात विविध प्रश्न विचारीत महिलांना कार्यक्रमांची रंगत वाढवित महिलांनी टाळ्यां वाजवित प्रोत्साहित केले.

विविध गेम स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या सपना अमृतकर, पुष्पा शिरोळे, वंदना टिपरे, अंकिता शिरोळे, सुरेखा शिरोळे, वैशाली अमृतकर, वंदना शेंडे यांना बक्षिस वितरण करण्यात आले. उपस्थित महिलांन मधील वैशाली मनोज अमृतकर या पैठणीच्या मानकरी महाविजेत्या ठरल्या सपना रमेश अमृतकार या उपविजेत्या ठरल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपाली शिरोळे, शीतल टिपरे यांनी केले सौभाग्याच्या वाणाचे वाटप ज्योती शिनकर, सुनिता भामरे, सुनंदा शेंडे, विद्या येवले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्षा रुणल कोतकर, सचिव वर्षा कोठावदे, खजिनदार दीपिका शेंडे व मंडळाच्या सदस्यांनी केले.


Protected Content

Play sound