Home राष्ट्रीय कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी : अनेक भाविकांचा मृत्यू !

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी : अनेक भाविकांचा मृत्यू !

0
62

प्रयागराज-वृत्तसेवा | आज मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभात भाविकांचा जनसागर उलटला असतांनाच येथे चेंगराचेंगरी होऊन 17 भाविकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

प्रयागराज महाकुंभमध्ये आज रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना घडली आहे. संगम तटावर रात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक गर्दीचा ताण वाढल्याने भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १७ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी मेला प्रशासन आणि बचाव पथके दाखल झाली असून, जखमींना तातडीने महाकुंभच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर अखिल भारतीय अखाडा परिषद आणि साधू-संतांनी मौनी अमावास्येच्या स्नानाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आत दिवसांत पंचमीला शाही स्नान होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मेला प्रशासनाने भाविकांना संयम ठेवण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील अमृत स्नान बसंत पंचमीला होईल, असे अखाडा परिषदेने जाहीर केले आहे.

महाकुंभमधील हा प्रकार अत्यंत हृदयद्रावक असून, प्रशासन आणि श्रद्धाळूंनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे मत साधू-संतांनी व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound