Home क्राईम बसमध्ये चढतांना महिलेचे दागिने लांबविले

बसमध्ये चढतांना महिलेचे दागिने लांबविले

0
155


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातील प्लॅटफॉर्म नंबर ५ येथे बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या पर्समधून ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपिका अजय कुमार तिवारी वय-३२, रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर या महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगावत आलेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा गावाला जाण्यासाठी त्या सोमवारी २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथील प्लॅटफॉर्म नंबर ५ येथे आलेल्या होत्या. त्यावेळी जळगाव ते वैजापूर बस क्रमांक (एमएच ४० एन ९६६८) मध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 95हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने बस आवारात सर्वत्र शोध घेतला. मंगळवारी 21 जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे ह्या करीत आहे.


Protected Content

Play sound