Home राजकीय उदय सामंत शिंदे गटात फूट पाडणार होते ! : संजय राऊतांचा खळबळजनक...

उदय सामंत शिंदे गटात फूट पाडणार होते ! : संजय राऊतांचा खळबळजनक दावा !


मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार होते. त्यांच्यासोबत 20 आमदार होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे नाराज झाले होते. त्यावेळी भाजपने उदय सामंत यांना पुढे करण्याचा विचार केला होता. फडणवीस यांनी उदय सामंत यांना दावोसला नेले होते, जेव्हा शिंदे रुसून बसले होते. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार तयार होते. पण शिंदे सावध झाले, त्यामुळे हा प्लॅन बारगळला.”

दरम्यान संजय राऊत यांनी भाजपवरही तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी भाजपवर “फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या पक्षाचा” आरोप केला. “भाजप महाराष्ट्रात शिंदे गट फोडेल, अजित पवार गट फोडेल, आणि इतर पक्षांतही फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. फोडाफोडी हेच त्यांचं राजकारण आहे,” असं ते म्हणाले.


Protected Content

Play sound