Home Cities बुलढाणा जिल्ह्यात वितरण हानी कमी करण्याचे मोठे आव्हान : कार्यकारी संचालक औंढेकर

जिल्ह्यात वितरण हानी कमी करण्याचे मोठे आव्हान : कार्यकारी संचालक औंढेकर


बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात महावितरणच्या सेवेत गुणात्मक सुधारणा करा,वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीज चोरी विरोधात मोहिम राबवा,फॉल्टी/बंद मीटर असलेल्या ग्राहकाचे वीज मीटर तातडीने बदलून वीज ग्राहकांना अचूक वीजबिल द्या आणि प्रत्येक महिन्याला १००% त्या बिलाची वसुली करा असे स्पष्ट निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी दिले.

बुलडाणा गोलांडे लॉन येथे कार्यकारी संचालक यांनी जिल्ह्यातील जनमित्रांशी थेट संवाद साधला.यावेळी मुख्य अभियंता सुहास रंगारी,अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके,कार्यकारी अभियंते बद्रीनाथ जायभाय ,मंगलसिंग चव्हाण,विरेंद्र जसमतिया,रत्नदीप तायडे यांच्यासह जिल्ह्याचे पाचशे पेक्षा जास्त जनमित्र उपस्थित होते.यावेळी बोलतांना कार्यकारी संचालक म्हणाले की,राज्य विज नियामक आयोगाच्या मानकांनुसार सर्व नवीन वीज जोडण्या विहित मुदतीत देणे गरजेचे आहे, मुदतीनंतर विज जोडणी,तसेच सेवेत दिरंगाई झाल्याचे आढळल्यास कर्मचाऱ्यांना यापुढे दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्या़नी आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची सक्त ताकीत यावेळी त्यांनी दिली. तसेच यापुढे शहरी भागात मागेल त्याला २४ तासात आणि ग्रामीण भागात मानकांप्रमाणे वीज जोडणीवर कार्यवाही करण्यासंदर्भात निर्देश दिलेत.

वितरण हानी कमी करण्याचे जिल्ह्यात मोठे आवाहन आहे. त्यामुळे वीज चोरीवर विशेष लक्ष केंद्रीत करा.वीज चोरी विरोधात राबवित असलेल्या मोहिमेत सातत्य राखा.वीज चोरी हा फौजदारी गुन्हा आहे हे वीज ग्राहकांच्या लक्षात आणून द्या.तसेच कायमस्वरूपी ग्राहकांची प्राधान्याने तपासणी करा,अनाधिकृत वीज पुरवठा आढळल्यास त्या ग्राहकावर गुन्हा दाखल करा.जिल्ह्यात फॉल्टी मिटरची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने,त्या ग्राहकांचे मीटर तातडीने बदला आणि त्यांना अचूक बिल द्या. तसेच महावितरण वीज ग्राहकांप्रमाणेच विविध वीज निर्मीती करणाऱ्या कंपन्यांची एक ग्राहक आहे.तथापि वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वेळेत देयंकाचा भरणा करावा लागत असल्यामुळे महावितरणने वितरीत केलेल्या विजेच्या बिलाची वेळेत आणि १००% वसुली होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ग्राहकांनी मुदतीत वीजबिल भरण्याची सवय लावा असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले. पायाभूत सुधारणांशी संबंधित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना,मागेल त्याला सौर कृषी पंप योजना,सौर ग्राम योजना या विविध महत्वाकांक्षी योजनांचा सविस्तर आढावा घेत उद्धीष्टानुसार काम करण्याचे निर्देश यावेळी कार्यकारी संचालक श्री.धनंजय औंढेकर यांनी दिलेत.


Protected Content

Play sound