Home आरोग्य मंगळुर येथे अवैध दारु विक्री, पोलिसांकडे कारवाईची मागणी

मंगळुर येथे अवैध दारु विक्री, पोलिसांकडे कारवाईची मागणी

0
45
liquer lisance
liquer lisance


 

liquer lisance

रावेर प्रतिनिधी । मंगळुर आदिवासी गावात के-हाळा येथील एक व्यक्ती अवैध पध्दतीने दारू विकत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील गावाला लागून व धरणाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात अवैध पध्दतीने देशी-विदेशी दारू के-हाळा येथील पाटील नामक व्यक्ती विकत आहे. गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. या दारूच्या अवैध दुकाना पासून विद्यार्थीच्या आश्रम शाळा असून यामुळे मुलांना वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या दारूच्या दुकानापासून हाकेच्या अंतरावर मंगळुर आहे. हे धरणाच्या परिसरात असल्यामुळे मृत्युला आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणून या दारु विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यावर कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound