कोळी समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ॲड. अनिल नन्नवरे यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवाशी ॲड. अनिल देविदास नन्नवरे यांची लाल बहादूर शास्त्री किसान गन्ना संस्थान, लखनऊ, उत्तरप्रदेश येथे आयोजित अखिल भारतीय कोळी समाज राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद मा. खासदार व मा. लोकसभा अध्यक्ष श्री. विरेंद्र कश्यप यांनी भूषवले.

भारतभरातील बावीस राज्यांमधून प्रदेश अध्यक्ष या बैठकीत उपस्थित होते. यावेळी ॲड. अनिल नन्नवरे यांना त्यांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी केंद्रीय मंत्री भानूप्रताप सिंग, उत्तर प्रदेशचे श्रम व विकास मंत्री मनोहरलाल कोली यांची उपस्थिती होती.

ॲड. नन्नवरे हे गेल्या २० वर्षांपासून अखिल भारतीय कोळी समाज संघटनेत सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रवास सदस्य, युवक जिल्हा अध्यक्ष, खांदेश युवक कार्याध्यक्ष, खांदेश उपाध्यक्ष, प्रदेश सचिव म्हणून सुरु होऊन आता राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून झाला आहे.

या निवडीचे जलसंपदा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, प्रदेश अध्यक्ष परेशभाई कोळी, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीणकुमार बाविस्कर, जिल्हा संघटक गोपालशेठ नन्नवरे, रामचंद्र सोनवणे, धनराज साळूंखे, ॲड. स्मिता झालटे, मंदाताई सोनवणे, ॲड. रमाकांत सोनवणे, सुनिल नन्नवरे, भिकन नन्नवरे यांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content