जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मु. जे महाविद्यालय इव्हेंट मॅनेजमेंट विभाग व रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम खान्देश गॉट टॅलेंट 2025 उत्साहात झाला. कार्यक्रमात झी मराठी वरील सुप्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते यांची मुख्य उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, सुप्रसिद्ध विधी तज्ञ अँड नारायण लाठी, अँड राजेश झाल्टे ,रामलालजी चौबे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, डॉ निलेश चांडक, नोबेल स्कूल च्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, शर्लिन प्लास्टिकचे संचालक तेजांश कडू, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकलचे प्रवीण कूंजिवाल, समाजसेविका आशा अंभोरे, साई बजरंग जिम चे मोहन चव्हाण,उद्योजक प्रीतम मुनोत अँड मोहन शुक्ला , के सी ई सोसायटी सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोडकर, प्राचार्य संजय भारंबे यांची उपस्थिती होती.
परीक्षक म्हणून अँड डॉ महिमा मिश्रा व जाकिर खान ( जूनियर कुमार सानू) यांनी काम बघितले. सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले. इव्हेंट मॅनेजमेंट विभागचे समन्वयक पंकज कासार व इव्हेंट मॅनेजमेंटची संपुर्ण टीमने या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. एकूण 42 कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्या मधून 12 विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे
सोलो डान्स छोटा गट 1. शिरीन शेख 2. काव्या साळी 3. शिरणा देवकर
सोलो डान्स मोठा गट 1. अवनी चतुर्वेदी 2. धीरज राजपूत 3. राहुल यादव
ग्रुप डान्स 1. एम एच १९ squad ग्रुप 2. डीडीस बॉयस ग्रुप3. ड्रीम डान्स ग्रुप
गीतगायन 1. नझदिन शेख 2. मानसी अळवणी 3. अंजली मोरे उत्तेजनार्थ वैभवी साळी