विवाहितेचा छळ, चार चाकी वाहनासाठी सासरकडून १० लाख रुपयांची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील माहेर असलेल्या मोनिका अशोक बाविस्कर (वय-३४) या विवाहितेने सासरच्या मंडळींविरुद्ध छळाच्या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जळगाव येथील पिंप्राळा भागातील पती किशोर भगवान बाविस्कर यांच्यासह सासरच्या मंडळींनी चारचाकी वाहन घेण्यासाठी बाहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत त्यांना मारहाण व धमकी दिल्याचा आरोप आहे.

मोनिका यांचा विवाह रीतिरिवाजानुसार जळगावातील पिंप्राळा येथील रहिवाशी असेलेले किशोर बाविस्कर यांच्यासोबत झाला होता. परंतु, लग्नानंतर त्यांच्यावर सासरच्या मंडळींकडून चार चाकी वाहनासाठी १० लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. माहेराकडून पैसे मिळाले नसल्याने पती किशोर बाविस्कर, सासू ललिता भगवान बाविस्कर, ननंद दीपाली भगवान बाविस्कर, आणि हर्षदा जितेंद्र सोनवणे सर्व रा. जळगाव पिंप्राळा यांनी एकत्रितपणे मोनिका यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला.

या छळाला कंटाळून मोनिका माहेरी परत आल्या आणि अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मंगळवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता, पती किशोर भगवान बाविस्कर व इतर सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासकार्य सुरू केले आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नाना पवार करत आहेत.

Protected Content