Home क्राईम संतापजनक : वस्तीगृहातील १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

संतापजनक : वस्तीगृहातील १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वस्तीगृहात सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर याच वस्तीगृहाचे अधीक्षकाकडून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा लैंगिक अत्याचार होत असल्याचा बाब देखील उघडकीला आले आहे. इतकंच नाही तर मुलाने आपल्या आईला फोनवरून माहिती दिली म्हणून या अधीक्षकाने या अल्पवयीन मुलावर जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईने अमडापूर पोलीसात तक्रार दिल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बुलढाणा मुख्यालयापासून अखेरच्या अंतरावर चिखली तालुक्यात ही घटना घडल्याने सर्वत्र यंत्रणा अलर्ट वर आली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील पेठ तालुक्यात घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. ठाणेदार निखिल निर्मळ यांनी भारतीय न्यायसंहिता कलम ६८, ११८ (१) व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली. विनायक (विनोद) देशमुख वय-५२ असे आरोपी अधीक्षकाचे नाव असून, तो चिखली तालुक्यातील पेठ येथील रहिवासी आहे.

बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील पेठ वस्तीगृह तालुक्यातील पेठ येथे मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय अनुदान तत्त्वावर वसतिगृह कार्यान्वित आहे. या ठिकाणी जालना जिल्ह्यातील मजूर कुटुंबातील पीडित मुलगा शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित झाला होता. या मुलासोबत अधीक्षकच अनैसर्गिक कृत्य करत असल्याची बाब उघडकीस आली. पीडित मुलाचा १ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत अधीक्षकाने लैंगिक छळ केला. ही बाब मुलाने आईला सांगितली. कुटुंबीयांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. ठाणेदार निखिल निर्मळ यांनी ही घटना गांभीर्याने घेत अधीक्षक देशमुखविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्य दाखल केला.


Protected Content

Play sound