यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगावपासून जवळच असलेल्या दोनगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल मध्ये दिनांक ४ जानेवारी २०२५ या दिवशीय महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकारी कर्मचारी व शिक्षक यांच्यासाठी या क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील होते, तर प्रमुख अतिथी यावलच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके क्रीडा समन्वयक मुख्याध्यापक किशोरकुमार पाटील प्राचार्य प्रा. अशोक पाटील केंद्रप्रमुख कविता गोहिले विजय ठाकूर विजय सोनार मोहम्मद तडवीसह आदींची उपस्थिती होती.
डॉ. मंजुश्री गायकवाड गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केले व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर उद्घाटन गोड स्मित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक के. यु. पाटील यांनी प्रास्ताविक करून आयोजनाचे व खेळाचे महत्व सांगितले तर गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी स्पर्धेत भाग घेण्याची सूचना व नियमाची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु मयुरी बारी यांनी केले. या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रिकेट रस्सीखेच बॅडमिंटन कॅरम बुद्धिबळ धावणे. या सहा खेळ प्रकारांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांच्या संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला स्पर्धा घेण्यासाठी तालुक्यातील क्रीडा शिक्षक एम आर महाजन, के आर सोनवणे, आर आय तडवी, वाय. जी. कोळी, अश्विनी कोळी,शेख साजिद,पी एम भंगाळे, मोहम्मद फैजल खान, शेख सलीम जलालुद्दीन, एन. सी. पाटील, के यु पाटील पंच म्हणून सहकार्य लाभले.
खेळाडूंना दुखापत होऊ नये, यासाठी काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाचे यांचे पथक या ठिकाणी थांबून सहकार्य लाभले. शाळेने अब्युंलस ची सुध्दा व्यवस्था केलेली होती. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले. शेवटी समारोपीय कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, प्राचार्य अशोक पाटील मुख्याध्यापक के यु पाटील यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरावर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.