वृध्देचे बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चार दिवसांपासून घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरातून ३०हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, इंदुबाई तात्याबा पाटील वय-६५, रा. जिजामाता चौक, रायसोनी नगर, जळगाव या वृद्ध महिला वास्तव्याला आहेत. 31 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान वृद्ध महिलेचे घर बंद होते, याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून 30 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 69 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी 3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता समोर आली. दरम्यान या संदर्भात वृद्ध महिलेने रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.वृध्देचे बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चार दिवसांपासून घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरातून ३०हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, इंदुबाई तात्याबा पाटील वय-६५, रा. जिजामाता चौक, रायसोनी नगर, जळगाव या वृद्ध महिला वास्तव्याला आहेत. 31 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान वृद्ध महिलेचे घर बंद होते, याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून 30 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 69 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी 3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता समोर आली. दरम्यान या संदर्भात वृद्ध महिलेने रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.

Protected Content