Home क्राईम सीसीटीव्ही कॅमेरे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

सीसीटीव्ही कॅमेरे चोरटे पोलिसांच्या ताब्यात

0
52
4poice theft 4
4poice theft 4

4poice theft 4

रावेर प्रतिनिधी । येथील ग्राम पंचायत कार्यालयाच्या बाहेरील भिंतीचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञान चोरट्यांनी चोरुन नेले होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवीत तीन आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहेत.

याबाबत अधिक असे की, तालुक्यातील खिरोदा प्र. येथील ग्राम पंचायत कार्यालया बाहेरील भिंतीवरील 3,400 रुपये किमंतीचे सीपीप्लस कंपनीचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरटयाने चोरुन नेले होते. याबाबत रावेर पोलिसात ग्रामसेवक पौर्णिमा भालेराव यांच्या फिर्यादी वरुन भादवी कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत 3 चोरटयांना ताब्यात घेतले आहे. सुभाष महाजन, मोहनदास महाजन व हर्षल पारधी असे संशयितांचे नाव असून त्यांनी संगनमताने हे सीसीटीव्ही कॅमरे चोरुन नेले होते. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ सतिश सानप, पोहेकॉ जितेंद्र पाटील हे करीत आहे. आरोपींकडून सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.


Protected Content

Play sound