जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित मैत्र महोत्सवात आज सायंकाळी मी कशिनाथ घाणेकर हा एकपात्री नाट्य सादर करण्यात येणार आहे.
डॉ.काशिनाथ घाणेकर मराठी रंगभूमीवरील एक मनस्वी अभिनेते, त्यांचा रंगभूमीवरील वावर, शब्दफेक हे सगळंच खूप जबरदस्त अभिनयाचा अनुभव होता. या डॉक्टरांची गोष्ट देखील तशी खूप इंटरेस्टिंग ही आत्मकथा रंगमंचावर अनुभवण्याची संधी आज रसिकांना आहे.
हा नाट्य प्रयोग मुंबईचे कलावंत रमेश भिडे सादर करणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता भाऊंच्या उद्यानातील एंपी थिएटर मध्ये हा एकपात्री नाट्य जळगावकरांना अनुभवता येईल. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या नाट्यचा आनंद घ्यावा असे आवाहन परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्याकडून करण्यात आले आहे.