ओंकोरश्वर मंदीर परिसरातून कारची चोरी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील व्यंकटेश कॉलनीतील ओंकारेश्वर मंदीराच्या समोर पार्कींगला लावलेली कार चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश कांतीलाल जैन वय-४८, रा.व्यंकटेश कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान शनिवारी २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची कार क्रमांक (एमएच १९ सी ०७०७) ही घरासमोर असलेल्या ओंकारेश्वर मंदिराजवळ पार्किंगला लावलेली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून गेली. हे घटना दुसऱ्या दिवशी रविवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कार संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर त्यांनी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस चा अजून तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहे.

Protected Content