जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व कवयित्रीबहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोनटप्प्यातील नॅक मान्यता मध्ये सुधारणांसाठी आत्मनिरीक्षण आणि धोरण एकदिवसीयराष्ट्रीय चर्चासत्रातून महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील शिक्षणशास्त्रमहाविद्यालयांना नॅक बंगलोर संस्थेकडून करावयाच्या नवीन मूल्यांकन आणि मानांकन संदर्भात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करून उत्तम संधी शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना उपलब्ध करून दिली असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. साहेबराव भुकन, प्राचार्य डॉ. संजय भारंबे, अँड.प्रविणचंद्र जंगले, डॉ. केतन नारखेडे, डॉ.कैलास चौधरी, डॉ. प्रशांत भोसले, प्राचार्य डॉ.अशोक राणे , डॉ. युवाकुमार रेड्डी व डॉ,केतन चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकचर्चासत्राच्या समन्वयक डॉ. रंजना सोनवणे यांनी केले. दोन टप्प्यातील नॅक मान्यता मध्ये सुधारणांसाठीआत्मनिरीक्षण आणि धोरण या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगीकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचेअधिष्ठाता डॉ. साहेबराव भुकन यांनी २०२५ पासून नॅकच्या नवीन मार्गदर्शकतत्त्वानुसार मूल्यांकन व नामांकनासाठी नॅक समितीला सामोरे जाताना प्रत्येकमहाविद्यालयाने कशा पद्धतीने मानसिकता व तयारी केली पाहिजे या संदर्भात मौलिकमार्गदर्शन केले. एम.जे. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांनीसंस्था चालक, प्राचार्य, आयक्यूएसी समन्वयक व प्राध्यापकांचीभूमिका त्यांची जबाबदारी व नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासंदर्भात प्रेरणादायीमार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव,सहसचिव , अँड.प्रविणचंद्र जंगले,यांनी आपल्याअध्यक्षीय भाषणातून नॅकच्या नवीन मूल्यांकन व नामांकनाचे धोरण व अंमलबजावणी बाबतअत्यंत मुद्देसूद (लॉ पॉईंट) ने समर्पक व आश्वासक मार्गदर्शन केले. तर मान्यवरांचापरिचय स्वागत व सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी केले.
यावेळी डॉ.कुंदा बाविस्कर, डॉ.वंदनाचौधरी, डॉ.सुनिता नेमाडे, डॉ.गणेश पाटील, प्रवीण कोल्हे, आकाश बिवाल, संभाजी जमडाळे, मोहनचौधरी, मनीष वनकर तसेच विविध शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य, आयक्यूएसीचे समन्वयक, संशोधक विद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते. एम.जे. वरिष्ठ महाविद्यालयातील समन्वयक डॉ. केतननारखेडे यांनी जुनी मूल्यांकन व नामांकन पद्धती आणि नवीन मूल्यांकन व नामांकनपद्धती या संदर्भात तुलनात्मक विवेचन व विश्लेषण केले. चर्चासत्राच्या पहिल्यासत्रात साधन व्यक्ती डॉ.कैलास चौधरी यांनी नवीन मूल्यांकन व नामांकन बायनरीपद्धतीच्या संदर्भात विविध शंका व प्रश्न उपस्थित केले. या सर्व शंका व प्रश्नांचीउत्तरे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, साध्या व सोप्या भाषेतून मनोगत व्यक्त केले.जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी पहिल्यासत्राच्या अध्यक्षीय भाषणातून बायनरी नवीन मूल्यांकन व नामांकन पद्धतीत “वननेशन वन डाटा पोर्टल” या विषयावर नाविन्यपूर्ण माहिती दिली. याच सत्रात डॉ.प्रशांत भोसले व अध्यक्षा डॉ अनिता वानखेडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. दुसऱ्यासत्रात लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी व खिरोदा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्याप्राचार्या डॉ. लता सुलवाडे-मोरे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षणशास्त्रमहाविद्यालयातील आयोजक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.