मुक्ताईनगर शहरामध्ये रस्त्यावर वाहते गटारीची गंगा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहर हे अनेक समस्यांमुळे ग्रासलेले आहेतच तशात मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 13 हा समस्यांमध्ये एक नंबर वर असलेला प्रभाग आहे. तसेच बस स्टँड शेजारून जाणारा रस्ता हायवेला भेटतो. त्या रस्त्यावर शाळा क्लासेस असे लहान लहान मुलांची निदान मोठ्या प्रमाणावर सुरू असते.

अर्थात म्हणजे शांतीनगर हे मुक्ताईनगर मधील एक मोठे नगर आहे. शांतीनगर मधील गटारीचे काम व रस्त्यांचे काम तर झालीच पण मेन रस्त्यावर त्या गटारीचे पाणी सोडून दिल्यामुळे मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अवैध डंपर येथून ये-जा करत असल्यामुळे नागरिक खूप त्रास आहे व रस्त्याचे बारा वाजलेले आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अवैध अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता फेमस असल्यामुळे या ठिकाणी रस्त्याची सुविधा होत नसल्यामुळे नागरिकांचा संताप मावे नसा झालेला आहे. तसेच नगरपंचायतीला रहिवाशांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा ह्या रस्त्याची दशा पलट होत नाही असा नागरिकांचा आरोप आहे….

 

Protected Content