पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संघटनेचे धुळे जिल्ह्यात पदार्पण विश्वनाथ येथे महिला आघाडीची शाखा स्थापन दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत असून मजूर ,शासकीय धोरणे, बी -बियाण्यांची पॉलिसी, खतांची पॉलिसी,वाढती महागाई,सांगायला हमीभाव पण हमीभावाचे कोणतीही हमी नसताना पिकवलेल्या मालाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेती करणे खूपच कठीण झाले आहे. म्हणून शेतीमध्ये राबणाऱ्या माझ्या माय माऊली महिला शेतकऱ्यांने आता शेतीसह स्वयं रोजगाराकडे वळावे व आपले ध्येय साध्य करावे आणि ते फक्त संघटनेच्या माध्यमातून साध्य करता येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते विश्वनाथ तालुका धुळे येथे महिला आघाडी शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा तालुकाध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, कंकराज शाखा प्रमुख हर्षल पाटील हे उपस्थित होते तसेच गावातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पदाधिकारींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता महाजन यांनी केले सुत्रसंचालन पुनम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन माया पाटील यांनी मानले. महाराष्ट्र शेतकरी संघटनेची महिला नियुक्त पदाधिकारी आघाडीत शाखाध्यक्षा म्हणून माया रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष म्हणून सुनिता अधिकार पाटील, माहिती प्रमुख म्हणून मुक्ता संजय पाटील,उपाध्यक्ष म्हणून सुनंदा गणेश पाटील, संपर्क प्रमुख म्हणून अंकिता ज्ञानेश्वर पाटील, खजिनदार म्हणून बेबा शांताराम पाटील, महासचिव पुनम योगेश पाटील अशी होय.