२०३५ पर्यंत भारत तयार करण्यात येणार ‘भारतीय अंतराळ स्थानक’

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताचे अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी ‘भारतीय अंतराळ स्थानक’ बांधण्यात येणार आहे. हे अंतराळ स्थानक अंतिम मंजुरी आणि अभियांत्रिकी टप्प्यात असून २०३५ पर्यंत ते बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासंदर्भात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

२०२४ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगनयान महिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसंच, भारताने खोल समुद्र मोहिमेचा भाग म्हणून ६ हजार मीटरपर्यंत खोली शोधून समुद्रतळावर मानव पाठवण्याचीही यजना आखली असल्याचं त्यांनी सांगितले. सध्याच्या सरकारच्या काळात उपग्रह प्रक्षेपणात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवरही त्यांनी भर दिला. ते म्हणाले, भारताने श्रीहरिकटा येथून ४३२ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यापैकी ३९७ म्हणजे जवळपास ९० टक्के गेल्या दशकात प्रक्षेपित केले गेले आहेत.

२०३० च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सेवामुक्त होणार आहे. त्यामुळे भारतीय अंतराळ स्थानक आपल्या देशाला जागतिक लाभ देऊ शकतो. भारताचे अंतराळ स्थानक पाश्चिमात्य देशांमधील आमच्या मित्रराष्ट्रांना जागतिक संशोधन सहकार्यासाठी अवलंबून राहण्यासाठी एक महत्त्वाचे संसाधन प्रदान करेल, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘बीएएस’ पूर्णपणे स्वदेशी अभियांत्रिकीसह तयार केले जात आहे, परंतु आवश्यकतेनुसार संभाव्य जागतिक सहकार्याचा पर्याय भारताने खुला ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था बंद होणार असल्याने ‘बीएएस’ अग्रगण्य व्यासपीठ म्हणून उदयास येईल, असा विश्वास संशोधकांना आहे.

Protected Content