Home JCL वृध्दाचे बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

वृध्दाचे बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शंकर आप्पा नगरात राहणाऱ्या एका वृध्दाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि कॅमेरासह इतर साहित्य असा एकुण ४३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रामिसिंग हिलाल पाटील वय ६४ रा. शंकर आप्पा नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ६ ते ९ डिसेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने, महागडी घड्याळ आणि कॅमेरा असा एकुण ४३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रामसिंग पाटील यांनी सायंकाळी ५.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound