जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काकांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधी आटोपल्यानंतर घरी जात असताना अचानक दुचाकी घसरल्याने झालेल्या गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वराला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप्चरादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण सदाशिव कोळी वय २३, रा.सार्वे बुद्रुक ता.पाचोरा असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सार्वे गावात प्रवीण कोळी हा तरुण आई-वडील यांच्यासह वास्तव्याला होता. मोलमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान त्याचे काकाचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रवीण कोळी हा दुचाकीने सोयगाव येथक कंक्राळा येथे केलेला होता. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता तो दुचाकीने घरी परतत असताना शेंदुर्णी गावाजवळ त्याची दुचाकी अचानक स्लीप झाली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी वाहनाने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्याची प्राणज्योत मालविली. दरम्यान, या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे.