मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदी शक्ती श्री संत मुक्ताईच्या पावन भूमीला ७ डिसेंबर १९९७ रोजी एदलाबादचे नामकरण मुक्ताईनगर असे झाले. आज नामकरणाला तब्बल २७ वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात मुक्ताईनगरचे राजकिय, सामाजिक आणि भौतिक स्थित्यंतरे बदलली. मतदार संघाचे नेतृत्व केलेल्या प्रतिभा ताई देशाच्या १२ व्या आणि पहिल्या राष्ट्रपती झाल्यात ही गौरवाची बाब ठरली.
संयुक्त महाराष्ट्र निर्मिती पूर्वी एदलाबाद पेठा राज्य निर्मिती नंतर १९६२ मध्ये एदलाबाद तालुका झाला.डिसेंबर १९९७ रोजी एदलाबाद चे नामकरण मुक्ताईनगर आणि मुक्ताईनगर तालुका नव्या नावारूपात समोर आला. मुक्ताईनगर नमकरणा मागे अध्यत्मिक कारण ही होते. मुक्ताईनगरची शिव ओलांडली की कोथळी याच गावी संत ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई गुप्त झाल्या होत्या, अशी आख्यायिका आहे. आज श्रीक्षेत्र कोथळी येथे संत मुक्ताबाईचे प्रशस्त मंदिर आहे. श्रीक्षेत्र कोथळी हे गाव हतनूर प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित क्षेत्र बनले आणि मुक्ताईनगर शहरात बोदवड रोड वर भव्य मुक्ताई मंदिर आकारास आले. आज श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथे भाविकांची मांदियाळी असते
एदलाबादचे नाव मुक्ताईनगर करण्याचे श्रेय हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे होय. तसे ते मूळचे कोथळी येथीलच आणि मतदार संघाचे नेतृत्व करताना युती शासनात मंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत ७ डिसेंबर १९९७ रोजी नामकरण सोहळा शाही स्वरुपात पार पडला आणि एदलाबाद चे मुक्ताईनगर बनले. ३मे २००३ मध्ये आदी शक्ती मुक्ताबाई च्या नावाने टपाल तिकीट ही प्रकाशित झाले. तब्बल चार लाख टपाल तिकिटे त्यावेळेस छापली गेलीत.वारकरी संप्रदायाचे श्रद्धा स्थान असलेले संत मुक्ताबाई रूपाने मुक्ताईनगर एक शक्ती पीठ बनले. संत मुक्ताबाई चा आषाढी पालखी सोहळा पंढरीत मनाचा पालखी सोहळा आहे.तर संत मुक्ताबाई यात्रा, अंतर्धान सोहळा आणि परतीचा पालखी सोहळा सोहळा हे मुक्ताईनगर चे उत्सव असून दर वर्षाला या सोहळ्याचे रूप वारकरी भाविकांच्या उपस्थितीने अध्यात्मिक मुक्ताईनगराचे रूप देतात. आज श्रीक्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदीरा पुनर्विकास करण्यात येत असून प्रशस्त असे हेमाड पंथी रूपात हे मंदिर आकरास येत आहे.
एदलाबाद चे मुक्ताईनगर नामकरण १ डिसेंबर १९९७ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाले होते. ७ डिसेंबर१९९७ रोजी भुसावळ रोड लगत आजच्या गजानन महाराज मंदीर लगत च्या जागेत नामकरण सोहळा पार पडला होता. नामकरण सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन , विजयकुमार गावीत उपस्थित होते. नामकरण सोहळ्याला शाही मिरवणूक निघाली होती यात हत्ती, घोड्यांचा समावेश होता.