जुने जळगावातील अपुर्ण पाणीपुरवठा; संतप्त नागरीकांची पाणीपुरवठा कार्यालयात धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने जळगावातील होले वाडासह परिसरात अपुर्ण पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरीकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यापुर्वी स्थानिक रहिवाशी यांनी जळगाव महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना सोमवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निवेदन दिले होते. तरी देखील अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. दरम्यान आज सोमवारी २ डिसेंबर रोजी महापालिकेतील पाणीपुरवठा अभियंता योगेश बोरेले यांना संतप्त नागरीकांनी निवेदन दिले आहे. यावेळी बोरोले यांनी दोन दिवसात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुने जळगावातील होले वाडा आणि परिसरात गेल्या चार महिन्यांपासून कमी दाबामुळे पाणीपुरवठा अपुर्ण होत आहे. सुरूवातीचे काही घरांना पाणीपुरवठा होतो तर होलेवाडा परिसरातील रहिवाशांना पाणी मिळतनच नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. पाणीपुरवठा करण्याबाबत कोणतीही पुर्व सुचना मिळत नसल्यानंतर रोजगार बुडवून अनेकांना पाणी भरण्यासाठी घरीच थांबावे लागत आहे. शिवाय यापुर्वी महापालिकेकडे यासंदर्भात तक्रारही करण्यात आली होती. परंतू महापालिकेला नियमित पाणीपट्टी देवून देखील महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या परिसरातील पिण्याची पाईपलाईन चेक करून नियमितपणे मुबलक पाणी पुरवठा करावा. या मागणी आत संतप्त नागरीकांनी पांझरपोळ टाकी जवळील पाणीपुरवठा कार्यालयात जावून जाब विचारला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता योगेश बोरेले यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेत येत्या दोन दिवसात नागरीकांच्या समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह परिसरात नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content