नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) चेअरमनपद स्वीकारले आहे, ग्रेग बार्कले यांची जागा घेणारे ३५ वर्षीय जय शाह हे आयसीसीच सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. २०२० मध्ये पहिल्यांदा या पदावर नियुक्त झाल्यानंतर बार्कलेने तिसरी टर्म न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यानंतर या पदासाठी जय शहा यांची निवड झाली.
जय शाह आता शरद पवार, एन श्रीनिवासन, शशांक मनोहर आणि जगमोहन दालमिया यांसारख्या भारतीय प्रशासकांच्या यादीत सामील झाले आहेत. जय शाहने २००९ मध्ये क्रिकेट प्रशासनातील आपला प्रवास सुरू केला होता. सेंट्रल क्रिकेट बोर्ड, अहमदाबादच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी प्रवास सुरु केला होता, सप्टेंबर २०१३ मध्ये, शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) चे संयुक्त सचिव झाल्यानंतर अहमदाबादमधील प्रतिष्ठित नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बांधकामात मदत केली. २०१५ मध्ये, ते बीसीसीआयमध्ये वित्त आणि विपणन समितीचे सदस्य म्हणून सामील झाले.