मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 7 दिवस उलटले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. मात्र शपथविधीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105° ताप आला आहे. कणकणी आल्याने शिंदे दिवसभरापासून घराबाहेर पडलेले नाहीत. दरम्यान, डॉक्टरांची टीम मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आली आहे. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी सध्या सलाईन लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या घरातच त्यांना सलाईन लावले जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी ते गृह मंत्रालयावर ठाम आहेत. 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिंदे मुंबईत परतले आणि सर्व कार्यक्रम रद्द करून साताऱ्याला त्यांच्या गावी रवाना झाले. आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करण्यासाठी साताऱ्याला गेले आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे 105° असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचे सूत्रांकडून समजत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.