यावल येथील सोयाबीन खरेदी केंद्रास नाफेडचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भेट

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय गोदामात सुरू असलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रास मुबंई येथील नाफेडचे क्षेत्रीय अधिकारी चव्हाण यांनी भेट दिली व खरेदी झालेल्या सोयाबीनची पाहणी केली.

यावल तालुक्यात प्रथमच शासकीय पातळीवर नाफेडच्या माध्यमातुन कोरपावली वि.का.सो. कोरपावली तालुका यावल उप अभिकर्ता यांच्या माध्यमातुन सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली असून या खरेदीस तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावल तालुक्यातुन शेतकरी बांधवांकडून खरेदी केलेले सोयाबीन हे यावल कृषी उत्पन्न जार समितीच्या शासकीय गोदामात ठेवण्यात आले आहे. दरम्यान या सोयाबीन खरेदी केन्द्रास सोयाबीनची पाहणी करण्यासाठी मुबंई येथील नाफेडचे वरीष्ठ क्षेत्रीय अधिकारी सि एल चव्हाण यांनी भेट देवून खरेदी केलेल्या सोयाबीनची पाहणी करून उप अभिकर्ता कोरपावली तालुका यावल यांच्या माध्यमातुन खरेदी केलेल्या सोयाबीन या पिकाच्या पेरणीबाबत शेतकरी बांधवांनी अधिक काळजी घेण्याबाबतच्या उप अभिकर्ता यांना सुचना देण्यासंदर्भात मार्गदर्शन करीत खरेदी केलेल्या सोयाबीन प्रत बाबत नाफेडच्या वतीने समाधान व्यक्त केले .

Protected Content