Home Cities अमळनेर पती व नातेवाईकांना मारहाण करत विवाहितेचा विनयभंग; पाच जणांवर गुन्हा दाखल

पती व नातेवाईकांना मारहाण करत विवाहितेचा विनयभंग; पाच जणांवर गुन्हा दाखल


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहितेसह तिच्या पतीला आणि नातेवाईकांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली तर विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात विवाहिता हीआपल्या पती व नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. दरम्यान किरकोळ कारणावरून गावात राहणारा विजय उर्फ भाया साहेबराव पवार, शिवा नाना पवार, हिरा नाना पवार, भास्कर बारकू पवार आणि विनोद उर्फ पप्प्या गोकुळ पवार या सर्वांनी महिलेसह तिच्या पतीला आणि नातेवाईकांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर विवाहितेने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या पाचही जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहे.


Protected Content

Play sound