Home Cities जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे शालेय साहित्य वाटप

शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे शालेय साहित्य वाटप

0
86

जळगाव प्रतिनिधी । शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे वृत्तपत्र वाटप करणारे शालेय विद्यार्थी व विक्रेत्या बंधूंच्या पाल्यांना केमिस्ट भवन येथील कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे होते. त्यांनी विक्रेत्या बंधूंच्या हाऊसिंग सोसायटी व आरोग्यविषयक मदतीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी देखील मेडिकल व आरोग्यविषयक मदतीचे आश्‍वासन दिले. तर माजी नगरसेवक श्याम कोगटा व बाहेती कॉलेज सचिव रोहन बाहेती यांनी पेपर विक्रेत्या बंधूंच्या पाल्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदतीचे आश्‍वासन दिले.

प्रास्ताविक अशोक डहाळे यांनी केले. गोपाळ चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र जोशी यांनी अभार मानले. कार्यक्रमास नितीन चौधरी, अनिल पाटील, तुषार चौधरी, महेश सोनार, हरीश चौधरी, प्रमोद चौधरी, संतोष शळके, शिवाजी शिंदे, दिनेश वाणी, गणेश सोनार, प्रदीप वाणी, विजय कोतकर, भालचंद्र वाणी, नंदू जोशी, परेश नेवे यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound