जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी परिसरात विक्रीसाठी अवैधपणे गुटखा आणि तंबाखूचा साठा करणाऱ्या एकावर एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कारवाई करत सुमारे २ लाख ७४ हजार १६४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी परिसरात प्रतिबंधीत असलेला तंबाखू आणि गुटखाचा साठा करून विनापरवाना विक्री होत आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाख आणि एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता संयुक्त कारवाई करत न्यू सम्राट कॉलनीत राहणारा शुभम नरेशकुमार हंडी वय २८ यांच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरात २ लाख ७४ हजार १६४ रूपयांचा गुटखा आणि तंबाखूचा साठा मिळून आला. पोलीसांनी हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल हरीलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शुभम हंडी यांच्या विरोधात रात्री ११.३० एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.