Home Cities रावेर माजी आमदार आर.आर. पाटील यांचे निधन

माजी आमदार आर.आर. पाटील यांचे निधन

0
51

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी आमदार रामकृष्ण रघुनाथ पाटील उर्फ आर. आर. पाटील यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

थोरगव्हाण ता.रावेर येथील रहिवासी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्ो लेवा पाटीदार समाजाचे भूषण आणि डि.एस.देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष माजी आमदार रामकृष्ण रघुनाथ पाटील (आर आर पाटील) वय 83 यांचे काल रात्री 8-10 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा सकाळी 10 वाजता राहते घर थोरगव्हाण ता.रावेर येथून निघणार आहे.

आर.आर पाटील हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. 1980 ते 85 रावेर मतदारसंघातून आमदार बनले होते. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. यात ते काँग्रेस (अर्स गट ) पक्षाचे उमेदवार रामकृष्ण सिताराम पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे गुणवंतराव सरोदे यांना पराजीत करून आमदार बनले होते. शेवटपर्यंत ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले. त्यांच्या पश्चात पुत्र हेमांक्ष यांच्यासह परिवार आहे. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचा एक निष्ठावंत नेता तसेच समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound