पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यासह जिल्ह्यातील जवळपास पंधराशे शेतकरी यांनी सामाजिक वनीकरण,पंचायत समिती, कृषी विभाग या विभागांतर्गत साग, शेवगा सह विविध वृक्षांची लागवड करण्यासंदर्भात प्रकरणे संबंधित विभागात जमा केलेली होती आणि या प्रकरणांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
सरासरी अंदाजे हेक्टरी 15 ते 24 लाखापर्यंत नरेगा अंतर्गत लाभ मिळणार होता. परंतु सदर अंदाजपत्रकानुसार नरेगा अंतर्गत वर्क कोड पाच लाखाच्या वरती जनरेट होत नसल्याने आणि या विषयावर मी दिल्लीला संबंधीच्या भेटी निवेदन दिले आहे. पाहिजेल तसे शासन सकारात्मक दिसत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन वर्षाकरिता प्रति हेक्टरी साधारण 15 ते 24 लाख रुपयाचे नुकसान होताना दिसून येत आहे. म्हणून जे आमच्या हक्काचे आहे ते आम्ही सोडणार नाहीत त्यासाठी आम्ही कोर्टात जाऊ असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले. ते जुने पाणी महादेव मंदिर वाघरे येथे वृक्ष लागवड या योजनेच्या संदर्भातील बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना देवरे यांनी आवाहन केले की जिल्ह्यातील सर्व शेतकरी जे या बैठकीला येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्याकडे प्रशासकीय मान्यता आहे असे सर्व शेतकरीनी संघटनेसोबत यावे जेणेकरून त्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता येईल.
बैठकीत खालीलप्रमाणे ठराव पास करण्यात आले.
१) बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी सोबत येण्यासाठी ठरले असून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये याची खबरदारी घेण्यात यावी.
२) सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी एकजुटीने संघटनेसोबत उभे राहावे.
३) जे शेतकरी संघटनेसोबत येत नसतील अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील.
४) १०नोव्हेंबर पर्यंत सर्वांनी संघटनेसोबत 9890875238 यावर आपली नाव देणे आवश्यक असेल.
५) या प्रकरणासंदर्भातील सर्व तज्ञ मंडळींनी कागदपत्रासंदर्भात तसेच इतर विषयासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी.
६) रोजगार सेवक या योजनेचा महत्त्वाचा घटक असून यांनी लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत सदर माहितीचे आदान प्रदान करून योग्य ते सहकार्य करावे. जेणेकरून तो शेतकरी वंचित राहता कामा नये.
या बैठकीला तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. बैठकीत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते सुनील देवरे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थिती भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, सोयगाव तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, पारोळा कार्याध्यक्ष गुलाब पाटील, शिरसमणी गटप्रमुख नरेश पाटील ,शिरसमणी गणप्रमुख कमलेश महाजन, वाघरे शाखा प्रमुख संदिप पाटील, मेहू शाखा प्रमुख रावसाहेब पाटील, यांच्यासह संघटनेचे सर्व शाखाप्रमुखासह या संबंधित तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश पाटील यांनी मांडले.